Breaking News

एसएसआरटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर (एसएसआरटी) विद्यालयात एसएससी मार्च 2023च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा शुक्रवारी (दि. 10) आयोजित करण्यात आला होता. रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयतचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आणि उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा, बक्षीस वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच शिक्षकांना आणि उपस्थित मान्यवरांना भेट वस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून भविष्यातील आव्हानबद्दल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. गणेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान आणि भविष्यातील शैक्षणिक धोरण याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, मुख्याध्यापिका बल्लाळ मॅडम, ‘रयत’चे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, लाईफ वर्कर प्राध्यापक बोरगावे, सीबीएससी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply