आझाद हिंद शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पोलादपूर : प्रतिनिधी
आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी महाड एसटी आगारातील कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला. तत्पूर्वी एसटी कर्मचार्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी महाड तहसीलदार सुरेश काशिद यांच्याकडे सुपूर्द केले.
महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील व कोकण प्रदेश अध्यक्ष काळूराम आर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता देवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर झांजे, महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष संजय आंबावले, महाड तालुका अध्यक्ष बापू डोंबे, कामगार अध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष विजय चाळके, उज्ज्वला गायकवाड, हरिश्चंद्र उंदरे, बाळकृष्ण वाडकर, रामचंद्र मोरे, संदीप कदम, बबन बटावले, विद्याधर हेले, एकनाथ सुतार, दत्ताराम मोरे आदींनी तहसीलदार सुरेश काशिद यांची भेट घेतली व एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी तहसीलदार काशिद यांच्याकडे सुपूर्द केले.
त्यानंतर आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी महाड आगारातील संपावर असलेल्या एसटी कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्या सरकारीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला.

RamPrahar – The Panvel Daily Paper