पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल प्रभाग क्रमांक 19तर्फे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने झालेल्या विविध गटांतील या स्पर्धेत संयुक्ता संदीप शेलार, ईश्वरी विनय सोनटक्के, सानवी सिद्धय साईकर, विहान पाटील, अर्णव मयूर जोशी, निर्भया अभय सहस्त्रबुद्धे, गार्गी महेश म्हात्रे, चिन्मयी शैलेश भिडे, संस्कार सचिन पाटील, देवराज नितीन हांडे, अबिर प्रणव बवाले, रिशिका बांठिया, करिष्मा विनोद परमार यांनी चांगली कामगिरी करून क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विजेत्यांना आकर्षक चषक तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper