Breaking News

ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा

अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारला वगळले

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आगामी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी अनुभवी सुशील कुमारला वगळण्यात आले आहे. याचप्रमाणे माजी आशियाई विजेत्या अमित धानकरला (74 किलो) राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या संदीप मानपेक्षा प्राधान्य दिले आहे. सोफिया (बल्गेरिया) येथे 6 ते 9 मे या कालावधीत होणारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा ही टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी

अखेरची पात्रता स्पर्धा आहे. 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक कमावणार्‍या सुशीलने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते, परंतु टोकियो ऑलिम्पिकसाठी त्याच्या पात्रतेच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply