Breaking News

कंगना मुंबईकडे रवाना

मनाली : वृत्तसंस्था अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तिने केलेल्या वक्तव्यावर विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव सादर झाला आहे, तर दुसरीकडे कंगनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने करून 24 तासांत कागदपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना एक दिवस आधीच मनालीच्या घरातून मंगळवारी (दि. 8) मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूसंदर्भातील ड्रग्ज प्रकरणात कंगनाचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचे विधानसभेत सांगितले. देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगनाने आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचे आव्हान दिले आहे तसेच ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय, असेही कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply