टीआयपीएल सन्मान सोहळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोणतीही कंपनी मोठी व्हायची असेल, तर त्यासाठी कर्मचार्यांचा विश्वास महत्त्वाचा असतो. टीआयपीएल कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचारी तो विश्वास सिद्ध करून जीव तोडून काम करतात. म्हणून तुमचे अभिनंदन करतो, असो गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यावेळी काढले.
दानशूर व्यक्तिमत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर टीआयपीएल अर्थात ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा.लि. कंपनीतील कर्मचार्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादित केलेल्या पाल्यांचा सत्कार सोहळा शनिवारी (दि. 30) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, टीआयपीएलचे डायरेक्टर अमोघ ठाकूर, एम.पी. त्यागी, सी.एस. भरणीकुमार, चीफ अकाउंटट अरुण नाईक यांच्यासह कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, आतापासून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल. टीआयपीएलमधील कर्मचार्यांच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी कंपनी मदतदेखील करेल तसेच त्यांना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये 50 टक्के फी माफी देण्याचे या वेळी जाहीर केले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपण जो शब्द देतो तो पाळतो हा विश्वास कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केला आहे, तर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. अशा वेळी जेवढे महत्त्व परीक्षांमधील गुणांना आहे तितकेच व्यक्तिमत्व विकासालाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत कार्तिकी आर्गे, सानिका पाटील, स्वरा खेडकर, दुर्वा कडू, श्रेया घरत, पार्थ मोहिते, वैदेही म्हात्रे, अन्वी लाल, सेजल ठाकूर, युग मोकल, करुण्या गायकर, अनन्या चौहान तसेच बारावीच्या परीक्षेत श्रद्धा श्रीवास्तव, पार्थ सकपाळ, गार्गी काळे, जय तांडेल, शुभम कोळी आणि काजल कुमारी यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि टीआयपीएलचे डायरेक्टर अमोघ ठाकूर यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper