Breaking News

कराटेत इंगळे भावा-बहिणीचे सुयश

कर्जत : बातमीदार

किमुरा शोकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अजिंक्य इंगळे आणि अस्मिता इंगळे या बहीण-भावंडाने पदके पटकाविली. त्यांचे कौतुक होत आहे.

या स्पर्धेत सुमारे 255 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात टिटवाळा शहरातील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे प्रशिक्षण घेणारे अजिंक्य विनोद इंगळे (वय 9) आणि अस्मिता विनोद इंगळे (वय 7) यांचाही समावेश होता. यापैकी अस्मिताने काता कौशल्यमध्ये सुवर्णपदक आणि कुमिते कौशल्यमध्ये रौप्यपदक जिंकले, तर अजिंक्यने कुमिते आणि काता दोन्ही कौशल्यांमध्ये रौप्यपदक जिंकले.

या कामगिरीबद्दल टिटवाळ्यातील मेरीडियन स्कूलचे प्राचार्य विनायक कोळी, विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन यांनी अजिंक्य व अस्मिता यांचे अभिनंदन केले.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply