Breaking News

कर्जतमधील ‘उबाठा’ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश सुभाष भगत आणि शशिकांत रामचंद्र बुंधाटे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. त्यानंतर त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली.
पनवेलमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजप कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष राजेश भगत, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे जिल्हा संयोजक नितीन कांदळगावकर, नेरळ मंडळ सरचिटणीस वैभव भगत, उपाध्यक्ष रामदास भगत, अल्पसंख्याक मोर्चा प्रतिनिधी अब्दुल हक नजे आदी उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply