कर्जत : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन कार्यरत असून उद्योजक, कंपन्या, स्वयंसेवी संस्थाही या युद्धात सहभागी होऊन मदत करीत आहेत. अशाच प्रकारे कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील श्री गजानन, श्री महालक्ष्मी आणि श्री हनुमान देवस्थानच्या वतीने जिल्हा आपत्ती निवारण निधीला मदतीचा धनादेश देण्यात आला आहे.
वेणगाव येथील देवस्थानच्या वतीने 25 हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय (प्रांत) अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष रंजन दातार, खजिनदार दीपक बेहेरे, विश्वस्त विशाल जोशी उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper