
कर्जत : बातमीदार – कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्गावर दोन लहान पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली होती. शासनाने सार्वजनिक हिताची कामे करण्यास तिसर्या लॉक डाऊनमध्ये परवानगी दिल्यानंतर तुटपुंज्या मजुरांना सोबत घेऊन कर्जत तालुक्यातील या दोन्ही पुलांची कामे पूर्णत्वाकडे नेली हात आहेत.
कर्जत-नेरळ-शेलू कर्जत हद्द या कर्जत-कल्याण राज्यमार्गाचा भाग असलेल्या रस्त्यावर हायब्रीड तत्वावर रस्त्याचे काँक्रीटकरण आणि डांबरीकरणाची कामे मंजूर आहेत. या रस्त्याच्या 21 किमी भागातील कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यात नेरळ ग्रामपंचायत हद्दीत दोन अरुंद पूल होते. त्या दोन्ही पुलांच्या बाजूला नवीन पूल बांधण्याची कामे मंजूर होती. मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे दोन्ही पुलांची कामे ठप्प झाली होती. आता काम सुरू झाले असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलांची कामे पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper