Breaking News

कर्जतमध्ये नवीन रेल्वेपुलासाठी पाठपुरावा करणार -मंत्री आशिष शेलार

कर्जत ः प्रतिनिधी
कर्जतच्या चारफाटा येथे वाहतूक कोंडी होते. ती सुटावी म्हणून रेल्वेच्या नवीन पुलाची आवश्यकता आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करीन. त्याचप्रमाणे कर्जतला फार मोठा सांस्कृतिक वारसा असून अनेक कलाकार या भागातून पुढे आले आहेत. म्हणूनच या भूमीत राम गणेश गडकरी नाट्यगृह उभारले जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिकमंत्री तथा भाजपचे रायगड जिल्हा संपर्कमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी (दि. 27) येथे बोलताना दिली.
कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडगे, कर्जत आणि दहिवली येथे भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मंत्री आशिष शेलार मार्गदर्शन करीत होते.
या बैठकांना भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, आरपीआय कोकण संघटक राहुल डाळिंबकर, भाजप विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किरण ठाकरे, तानाजी चव्हाण, मंगेश म्हसकर, वसंत भोईर, दीपक बेहेरे, रमेश मुंढे, राजेश भगत, नरेश मसणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शेलार भाषणात पुढे म्हणाले की, ये फेव्हिकल का जोड हैं तुटेगा नही. आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेश लाड ही जोडी एकत्र आल्याने कर्जतमध्ये विकासाचा गाडा वेगाने पुढे जाईल. येथील विरोधकांकडून काय अपेक्षा काय करू? ज्यांची आघाडीच अभद्र आहे, त्यांच्याविषयी काय बोलावे? कर्जतसाठी काही करण्याची इच्छा नसलेली ही त्यांची परिवर्तन आघाडी घरचे परिवर्तन करणारी आघाडी आहे. या ठिकाणी आमची नैसर्गिक युती सक्षम असून आरपीआयदेखील आमच्यासोबत पाठीशी ठाम आहेत. त्यामुळे जनताही महायुतीला
साथ देईल.
आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले की, आपण ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करीत असून विरोधकांची परिवर्तन आघाडी नसून परिवर्तन करण्याच्या वल्गना करणार्‍यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. कर्जत शहरात विरोधाला विरोध करण्यासाठी उमेदवार दिले आहेत. ते उमेदवार फारसे शिक्षित नाहीत आणि त्यांचा उद्देश हा प्रामुख्याने आपल्या हाती नगर परिषदेच्या चाव्या असाव्यात हाच आहे, परंतु कर्जत आणि माथेरानमध्ये विकास काय असतो हे जनतेने पाहिले आहे आणि त्यामुळे मतदार हा कायम विकासाला साथ देतो हे या निवडणुकीतदेखील दिसून येईल.
सुरेश लाड यांचे शहराच्या विकासासाठी असलेले योगदान पाहता तुमची साथ पुरेशी आहे. तुम्ही आजारी असलात तरी आम्हाला नगर परिषद निवडणुकीसाठी तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे, असेही आमदार थोरवे यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महायुती बळकट आहे. त्यामुळे कर्जत नगर परिषदेत महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आपल्या भाषणात व्यक्त केला.
माजी आमदार लाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून कर्जत शहरातील राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यावरील अनेक पूल, रेल्वे उड्डाणपूल यांची कामे पूर्ण करावीत तसेच कर्जत शहर आणि पलीकडील भिसेगाव व गुंडगे यांना जोडण्याची गरज आहे, अशी गरज अधोरेखित केली.
या बैठकांना माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, रजनी गायकवाड, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. स्वाती लाड, नगरसेवकपदाचे उमेदवार अ‍ॅड. संकेत भासे, कोयल कन्हेरीकर, विशाखा जिनगरे, रामदास गायकवाड, जान्हवी देवघरे, प्रकाश डेरवणकर, किशोर कदम, अरुणा वायकर, ज्ञानेश्वर करणूक, अ‍ॅड. हृषिकेश जोशी, सुचिता वांजळे, स्वामीनी मांजरे, गौरी जोशी, वैभव सुरावकर, सुनील गोगटे, आम्रपाली डाळिंबकर, वैशाली मोरे, रॉली पाल, विजय हजारे, कोमल म्हामुणकर, अ‍ॅड. नेहा पेंदे, भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, भाजप जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, कल्पना दास्ताने, मंगेश म्हस्कर, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे अध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर माजी नगरसेविका दर्शना भोईर तसेच संध्या शारबिद्रे, सपना पाटील, शिल्पा म्हात्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply