वाहतूक कोंडी, भाऊरायांचा हिरमोड
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
परतीच्या पावसाचा तडाखा शनिवारी (दि. 6) कर्जतला बसला. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. भाऊबीजेचा दिवस असल्याने बहिणीकडे जाणार्या बंधुरायांची एकच त्रेधातिरपीट उडाली.
कर्जत चारफाटा परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चौक बाजूकडे सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे भाऊबीजेला जाणार्या बंधुरायांचे वेळापत्रक कोलमडले. त्यातच संध्याकाळी परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावल्याने बंधुरायांचा हिरमोड झाला.
RamPrahar – The Panvel Daily Paper