कर्जत : प्रतिनिधी
कर्जत ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे जागतिक कविता दिन साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी कविता, पोवाडे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. संस्थेचे सभासद दिलीप गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार संस्थेने कर्जत येथे कवी संमेलन आयोजित केले होते. कर्जत शहरांत जागतिक कविता दिन पहिल्यांदा साजरा झाला. त्यात बळीराम दिघे, रघुनाथ ढाकवळ, नंदकिशोर भोंडे, केतन गडकरी, अरुण मोकल, प्रकाश नगरकर, गणेश पावसकर, शिवाजी श्रीखंडे, विरेश्वर जोशी, चंद्रकांत साळवे, अशोक थोरवे, प्राजक्ता गरवारे, कृष्णा लाड, अच्युत कोडगीरे, रश्मी गांगल, विजयकुमार गोखले, सुभाषचंद्र नातू, दिलीप गडकरी यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. केतन गडकरी, विजयकुमार गोखले, रश्मी गांगल, प्राजक्ता गरवारे, सुभाष नातू यांच्या कवितांना रसिकांकडून विशेष दाद मिळाली. प्राजक्ता गरवारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला ज्येष्ठ कवी विजयकुमार गोखले, दिलीप गडकरी व ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांचा सन्मान करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper