Breaking News

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 2500 जणांचे लसीकरण

कर्जत ः प्रतिनिधी

मागील दीड महिन्यापासून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य विभाग कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर म्हणजेच पोलीस कर्मचारी, शिक्षक आदींना लस देण्यात आली. आता ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. दररोज 100 जणांना लस दिली जाते. आतापर्यंत 2500 जणांना कोविडची लस देण्यात आली. कर्जत व खालापूर तालुक्यातील लोकांसाठी उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. सुरुवातीला 1061 आरोग्य कर्मचारी व त्यानंतर पोलीस, शिक्षक अशा 800 जणांना, तसेच आतापर्यंत 589 ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात 2450 जणांना कोविडची लस देण्यात आली. सुरुवातीला लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येत नव्हते, मात्र आता ज्येष्ठ नागरिक लसीकरणास उत्तम प्रतिसाद देताहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडेंच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयश्री म्हात्रे, डॉ. आकाश गोरे, परिचारिका सारिका मोकल, अविशा मालकर, नवीन गजधने, अविनाश पाटील, केवल वरीक आदी आरोग्य कर्मचारी लसीकरणाचे काम करीत आहेत.

कर्जत, खालापुरातील लोकांसाठी एकच लसीकरण केंद्र असल्याने गर्दी होते. शंभरहून जास्त लोक आल्यास काहींना परत जावे लागते. लवकरच चौक येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध कण्यात येईल.

-डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, कर्जत उपजिल्हा रुग्णालय

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply