Breaking News

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची स्वागत कमान गायब

सरकार दफ्तरी मात्र कमान हटविल्याची नोंदच नाही

कर्जत : बातमीदार

येथील उपजिल्हा रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले, तेव्हा प्रवेशद्वारावर असलेली लोखंडी कमान हटविण्यात आली. त्या कमानीचे पुढे काय झाले, याबाबत माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत काढलेल्या या स्वागत कमानीची नोंदच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर  काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वागत कमान  उभारली होती. त्यामुळे सदर कमान हटविताना त्या  विभागाला लेखी कळविणे क्रमप्राप्त होते. ही मोठी लोखंडी कमान कोणी हटविली किंवा गायब केली याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत उत्तर तथा खुलासा देण्यास असमर्थता दर्शविली.  कमान चोरून नेली असेल तर त्याबाबत रुग्णालय प्रशासनाने पोलीस ठाण्यात दाखल का केली नाही,  असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी केला आहे.

या संदर्भात अलिबाग सामान्य रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी पी. डी. धामोडा यांची भेट घेऊन कमान गायब झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी लगेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित कर्मचारी बंधू बीटाळे यांना दूरध्वनीद्वारे कमानीबाबत विचारणा केली. मात्र बीटाळे यांनी याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे धामोडा यांनी, स्वागत कमान पूर्ववत आहे त्या जागेवर उभारली नाही, तर तुमच्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असा सूचना वजा इशारा दिला. तसेच रुग्णालयाच्या प्रथमदर्शनी भागात माहिती अधिकाराचे फलक लावून त्यामध्ये अपील अधिकार्‍याचे नाव आणि मोबाइल नंबर तसेच कार्यालयाचा संपर्काचा पत्ता नमूद करावे असे आदेश दिले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply