Breaking News

कर्जत खांडस येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील खांडस गावातील एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि नंतर लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, विधी संघर्षग्रस्त 16 वर्षीय बालक फरार आहे.

खांडस गावातील अल्पवयीन मुलीची आई (वय 32) 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील ओहोळावर कपडे घुण्यासाठी गेली होती, तर वडील कामानिमित्त चई या गावात गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलीला शेजारी राहणार्‍या 16 वर्षीय मुलाने  ओढत घरात नेले आणि त्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केली. तसेच लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने नेरळ पोलीस ठाण्यात केली असून, त्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीची आरोग्य तपासणी केल्यानंतर नेरळ पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक माधवी मुळीक अधिक तपास करीत आहेत.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply