कर्जत : प्रतिनिधी
भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गलिच्छ टीकेबद्दल कर्जत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुधवारी (दि. 12) जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तसेच यापुढे अशा प्रकारच्या टिकेला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला.
निषेधावेळी कर्जतच्या टिळक चौकात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका चिटणीस जनार्दन म्हसकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे, विजय जिनगरे, दिनेश गणेगा, सर्वेश गोगटे, मिनेश मसणे, राहुल मसणे, सुर्यकांत गुप्ता, दर्शन कांबरी, राजेश ठाणगे, महेश भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध ‘शिल्लक सेनेचे नेते उद्धव ठाकरे हाय हाय’ अशा घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला. ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. सुनील गोगटे यांनी, उद्धव ठाकरे यांनी कोण कलंकित आहे त्याचे आत्मपरीक्षण करावे, असे सूचित केले, तर दीपक बेहेरे यांनी, कोविड काळात मुख्यमंत्री असताना प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला, दोन साधूंची हत्या झाली आदी गंभीर घटना घडल्या. त्याला कलंक म्हणायचे की काय म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित केला.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper