Breaking News

कर्जत रेल्वे पोलिसांकडून चोरीची घटना उघड

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शेलू रेल्वे स्थानकातील प्रवाशाचा  मोबाईल फोन जबरदस्तीने पळवून नेणार्‍या दोघा चोरट्यांना कर्जत रेल्वे पोलिसांनी जेेरबंद केले असून, त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे.

रोहित रमेश शिंदे (वय 21) हा तरूण 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता शेलू स्थानकांतील फलाट क्रमांक एकवरून जात होता. त्यावेळी दोन अनोळखी तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेला. याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला असता, गुन्ह्यातील आरोपी हे शेलू रेल्वे स्टेशन लगतच्या भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी सरकाळे, हवालदार ज्ञानेश्वर पाटील, पोलीस नाईक हेमंत शिंदे, शिपाई समिर पठाण, अक्षय पेरणेकर यांनी सदर ठिकाणी जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडून 16 हजार रुपये किमतीचा  मोबाईल हस्तगत केला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply