Breaking News

कर भरल्यास मोफत दळण

महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

महाड : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीचा थकीत कर भरणा करा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या, असा अभिनव उपक्रम महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीने सुरु केला आहे. कायम वादासाठी प्रसिद्ध राहिलेल्या या ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरु केल्याने कौतुक व्यक्त केले जात आहेच शिवाय विकासाच्या नवीन वाटचालीस ही एक सुरवात असल्याचे सरपंचाने दाखवून दिले आहे.

महाड तालुक्यातील खर्डी हे रायगड परिसरातील डोंगरात वसलेले गाव. दरवर्षी या गावात कांही ना कांही वाद आहेच. यामुळे येथील ग्रामस्थांच्या पोलीस ठाण्याच्या वार्‍या आणि कोर्ट कचेर्‍या नित्याच्याच बनल्या होत्या. मात्र गावाच्या विकासाची दोरी संदेश महाडिक या एका तरुण सरपंचाकडे आली आणि नवनवीन योजना सुरु करण्यास सुरुवात झाली. संदेश महाडिक याने ग्रामस्थांना लागणारी वीज, पाणी, रस्ते आणि इतर सुविधा पुरवताना ग्रामपंचायतीचे उत्पन्न देखील वाढले पाहिजे, या हेतुने कर वसुलीचे प्रयत्न सुरु केले. त्यासाठी गावात लोकसहभागातून एक पीठाची गिरणी खरेदी करण्याचा मानस व्यक्त करून, जो कोणी थकीत कर भरणा करेल त्या कुटुंबास लागणारे दळण मोफत दळून दिले जाईल, असे जाहीर केले. त्याची माहिती कळताच गावाच्या नगरभुवन वाडीने आपला थकीत कर भरणा पहिल्याच दिवशी अदा केला.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply