कळंबोली : रामप्रहर वृत्त
येथील गटरावरील तुटलेल्या अवस्थेतील झाकणे, खराब रस्ते यांसह विविध नागरी समस्यांबाबत भाजप पदाधिकार्यांनी सिडकोच्या कार्यालयात अभियंता बनगर यांची भेट घेतली. या वेळी समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकार्यांनी बनकर यांच्याकडे केली. शहर मंडल अध्यक्ष रविशेठ पाटील, सरचिटणीस दिलीप बिष्ट, उत्तर भारतीय अध्यक्ष केशव यादव, प्रकाश मुंबईकर, विलास तिठे, मच्छींद्र कुरुंग, अमृतलाल चौहान आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper