Breaking News

कळंबोलीत चोरीप्रकरणी दोघांना अटक

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फायर ब्रिगेडजवळ ट्रेलर आणि त्यातील मालासह 20 लाख रुपयांची चोरी करणार्‍या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल परत मिळवण्यात आला आहे. कळंबोली फायर ब्रिगेडजवळ 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता चालक सोपान वनखेडे याने उभा करून ठेवलेला ट्रेलर (एमएच 46-एच 5314) दुसर्‍या दिवशी पहाटे 2च्या दरम्यान त्यातील 12 लाख रुपयांच्या 30 टन स्टीलसह पळवून नेल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास परिमंडळ -2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे यांच्या अधिपत्याखाली उपनिरीक्षक मनेश बच्छाव व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती मिळवून सुरू केला. त्यांनी अलिअन्वर समसाद अहमद शेख आणि महमुद अब्दूल हकीम खान (दोघेही रा. गोवंडी, मुंबई) यांना ताब्यात घेतले. या वेळी अलिअन्वर शेख याने तिसरा आरोपी जाबीर याच्या मदतीने चोरी केलेला माल गोवंडी बैंगनवाडी येथे लपवून ठेवला असल्याचे समजले. हा माल पोलिसांनी ताब्यात घेतला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक मनेश बच्छाव, हवालदार ब्रम्हदेव जाधव, कृष्णा माळी, संजय भोरे, सुनील कानगुडे, अलका पाटील, सचिन शेवाळे, किशोर टेकाळे, किशोर म्हात्रे, सुनील वाघ, सावंकुमार इंगळे, संजय गीते, शेखर येवले या पथकाने केला.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply