पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाचे कळंबोली शहर संघटक विजय गर्जे यांनी सोमवारी (दि. 6) पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक बबन मुकादम आणि भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, आदिनाथ जायभाये, लक्ष्मण जायभाय, दिनकर बडे, भाजप कळंबोली शहर चिटणीस मनीष तिवारी उपस्थित होते.
या वेळी शेकापचे कळंबोली शहर संघटक विजय गर्जे यांच्यासह शुभम पाटील, दिनेश निशाद, धवल भट्ट, सद्दाम शेख, अनिश सिंग, मनिंदर सिंग, मनमीत संगेरा, अरनेश मेदी, साहील पवार, आमीर खान, जतिनंदर सिंग, अमरितपाल सिंग, शुभम विश्वकर्मा, संजय माने, प्रफुल्ल शिंदे यांनी भाजमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीत शेकापला जोरदार धक्का बसला आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper