Breaking News

कळंबोली परिसरात फिरणार्‍या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याची मागणी

पनवेल ः वार्ताहर

कळंबोली सर्कलसह एसटी स्टँड परिसरात फिरणार्‍या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मागणी परिसरातील रहिवासी व वाहनचालक करीत आहेत. कळंबोली सर्कल येथे सिग्नलला गाडी थांबताच वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी किंवा पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या काचा पुसण्यासाठी तर काही वेळा पैसे मागण्यासाठी अल्पवयीन मुले टोळ्याने फिरत असतात. भर पावसात ही मुले अचानक वाहनांच्या पुढे आल्याने अपघातसुद्धा घडत असतात. अशीच अवस्था नवीन पनवेल येथील सिग्नल व बसस्थानक परिसरात आहे. अशा मुलांना ताब्यात घेऊन त्यांना योग्य मार्गी लावणे घरजेचे बनले आहे. यासाठी संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी रहिवासी व वाहनचालक यांच्याकडून होत आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply