Breaking News

कळंबोली शहरात सुरळीत पाणीपुरवठा करावा

प्रभाग समिती-ब सभापती प्रमिला पाटील यांची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अडचणी येत असून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी प्रभाग समिती-ब सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात, कळंबोली शहराला सद्य स्थितीत 28 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे, मात्र शहराची वाढती लाकेसंख्या पाहता अतिरिक्त 7 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. शहरात साप्ताहिक दोन दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येतो. तो रद्द करुन 1 दिवसीय खंड ठेवण्यात यावा, महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाकडून होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो. या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था असावी, अशा मागण्यात करण्यात आल्या आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply