Breaking News

कळंबोली स्टील मार्केटमध्ये असुविधा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आंदोलन

पनवेल ः वार्ताहर

आशिया खंडातील क्रमांक एकचे कळंबोली स्टील मार्केट समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. याविरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने शुक्रवारी (दि. 25) आंदोलन केले. यानिमित्ताने एक दिवसीय लाक्षणिक बंदचे आवाहन पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले होते. याला प्रतिसाद मिळाला. या वेळी कळंबोली स्टील मार्केट परिसरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, कामोठे शहर प्रमुख सुनिल गोवारी, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब आदीसह मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग सहभागी झाला होता. या वेळी बोलताना संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले की, कळंबोली स्टील मार्केटमध्ये सुविधांची वानवा आहे. रस्ते, पाणी, पथदिवे, पावसाळी गटारे याशिवाय धुळीचे साम्राज्य अशा अनेक समस्यांच्या चक्रव्युहामध्ये मार्केट अडकले आहे. त्याचा त्रास व्यापारी, वाहतूकदार, माथाडी कामगार त्याचबरोबर इतर सर्वांना होत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने बाजार समितीला याबाबत 25 नोव्हेंबरचे अल्टिमेटम दिला होता, परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून बाजार समितीमधील मूलभूत सुविधांच्या न्याय हक्कासाठी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले आहे. या वेळी बाजार समिती अधिकार्‍यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदन स्विकारले तसेच त्यांच्या भावना शासनापर्यंत पोचहवून एक महिन्याच्या आत समस्यांचे निवारण करू, असे आश्वासन दिले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply