Breaking News

कसळखंड गावात विकासकामांचा शुभारंभ

सरपंच माधुरी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

कसळखंड गु्रप ग्रापंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्याअंतर्गत आमदार महेस बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून करण्यात येणार्‍या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) झाले. तसेच या वेळी आंगणवाडीच्या दुरुस्तीच्या कामाची शुभारंभ झाला.

कसळखंड गु्रपग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्याच्या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून करण्यात येणार आहे. त्यानुसार पालटा माल ते जे. के. पाटील यांच्या घरापर्यंत्तच्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून झाला आहे. पाच लाख रुपये निधी वापरून ह्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे तसेच माधुरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर अंगणवाडीच्या दुरुस्तीचे कामही सुरू झाले आहे.

या वेळी उपसरपंच महेंद्र गोजे, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, गणेश अगिवले, सचिन दुर्गे, माजी सरपंच जे. के. पाटील, निवेदिता लबडे, माजी उपसरपंच सरपंच रजना नाईक, महादेव पाटील, रवि घरत, जयेश मते, जगदीश पाटील, श्री. गाडे, माई गायकर, कविता मते, बूथ अध्यक्ष यशवंत पाटील, तानाजी पाटील, दिनेश नाईक, जगदीश पाटील, संतोष घरत, तुलशीराम घरत,  हरेश पाटील, मनीषा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …

Leave a Reply