
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 19मध्ये रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, तसेच मनोज आंग्रे, अच्युत मनोरे, अभिषेक पटवर्धन, पवन सोनी, विनायक मुंबईकर, अनिल कुरघोडे आदी सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper