Breaking News

कामगारांच्या मागण्यांना केंद्रीय मंत्र्यांचा प्रतिसाद

भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक महासंघाची केंद्रीय मंत्री सोनवाल यांच्यासोबत बैठक

 

उरण : प्रतिनिधी, बातमीदार

देशाचे केंद्रीय नौकानयनमंत्री सरबानंद सोनवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेऊन देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा घडवून आणली. यामध्ये वेतन करार लवकरात लवकर करावा व इतर महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन केंदिय नौकानयनमंत्री सरबानंद सोनवाल यांना दिले.

यासोबतच वेतन करार समितीमध्ये सर्व महासंघांना समान संधी द्यावी, अशी मागणी केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई पोर्ट येथे भारतीय मजदूर संघास कार्यालय मिळावे, अशी मागणी मंत्री महोदयांकडे केली. त्यावर मंत्री महोदयांनी ही मागणी लगेच मंजूर करून भारतीय मजदूर संघास मुंबई पोस्टमध्ये कार्यालय देण्याचे मान्य केले.

या चर्चेमध्ये केंद्रीय नौकानयमंत्री सरबानंद सोनवाल तसेच नौकानयन चीफ सेक्रेटरी राजीव नयन व नौकानयन मंत्रालयातील इतर अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य कामगार नेते सुरेश पाटील, विशाखापट्टणचे बी. एम. एस.चे कामगार नेते गोपी पटनायक, पॅरादीप पोर्ट बी. एम. एस.चे कामगार नेते श्रीकांत राय व इतर नेते उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री महोदयांनी भारतीय मजूर संघाच्या कामगार नेत्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगारांचे प्रश्न समजून घेतले व या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply