
उरण : शहरातील कामठा येथील श्री राधाकृष्ण मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवास जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह नगरसेवक कौशिक शहा, राजेश ठाकूर, धनंजय कडवे, संतोष ओटावकर यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास माळी, उपाध्यक्ष बाबुराव हंडोरे, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, सचिव विजय कडू, सहसचिव चंद्रभान ठवरी खजिनदार नरेंद्र तांडेल, सहखजिनदार जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper