Breaking News

कामोठे वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

पनवेल ः वार्ताहर

कामोठे वसाहतीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखांली काढलेल्या भव्य मिरवणुकीला कामोठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या वेळी जगदीश गायकवाड यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व भिमसैनिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाजत गाजत, ढोल-ताशा तसेच लाठी-काठीचे प्रदर्शन करीत कामोठे वसाहतीमधून ही मिरवणूक निघाली होती. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने कामोठे दुमदुमले होते. यानिमित्ताने विविध ठिकाणी, विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना सरबताचे वाटप, नाश्ताचे वाटप करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित विविध स्पर्धेसंबंधातील माहिती जगदीश गायकवाड यांनी दिली.

समाजातील प्रत्येक जण आज या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याने मनापासून आनंद होत आहे. तरुण पिढीने अधिक शिक्षण घ्यावे, उद्योग व्यवसाय करावा व समाजाचे नाव मोठे करावे असे आवाहन करीत यासाठी सर्वतोपरी मदत मी करीन, असे आश्वासन जगदीश गायकवाड यांनी याप्रसंगी दिले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply