Breaking News

कारगिल युद्धातील जवानांनी खोपोलीत दिला रोमहर्षक आठवणींना उजाळा

खोपोली : प्रतिनिधी

माजी सैनिक सेवा संघटना-खोपोली आणि सैनिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिनानिमित्त येथील माध्यमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय स्थलसेना, वायुसेना व नौसेना दलातील माजी सैनिकांनी भारत-पाक युद्धातील साहसी, थरार अनुभव व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अमर जवान ज्योत प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पूर्व वायुसेना रडार ऑपरेटर भरत काकडे यांनी दाखविलेल्या जादुच्या विविध प्रयोगांसोबत फडकवलेल्या तिरंगा ध्वजाला राष्ट्र गीताने मानवंदना देण्यात आली.

मेजर विवेक बोडस यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, विकासासोबत इतर आवश्यक माहिती दिली.   मुख्याध्यापक मोहन पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माजी सैनिक प्रकाश महाडीक, बी. एन. भोसले, विजय जगताप, गुरुनाथ तावडे, जे. पी. यादव, ए. पटनायक, रमाकांत मोदी, शिवाजी धनावडे, प्रकाश उतेकर, भरत काकडे, रंजना रमाकांत शिंदे, जयसिंग कदम, सैनिक मित्र गोपाळ हंचलीकर इत्यादी मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply