Breaking News

कारचोराला रत्नागिरीतून अटक

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील काशीद येथील एका बंगल्यात ठेवलेली इनोव्हा गाडी (एमएच 01 सीटी 1505) गाडीसह दोन महागड्या दारूच्या बाटल्या आणि 35 लिटरचे दोन डिझेल कॅन असा ऐवज घेऊन पसार झालेल्या आरोपीला मुरूड पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथून मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.दत्ताराम बाळाराम कदम उर्फ संकेत कदम असे आरोपीचे नाव असून, तो काशीद येथे एका ठिकाणी कामास होता. अशोक मथाई कुरियन व हौशी नानजी या दोघांचा फार्म हाऊस आहे. या बंगल्याच्या दरवाजाची काच फोडून व चावी प्राप्त करून कुरियन यांच्या मालकीची इनोव्हा गाडी व अन्य ऐवज कदम याने पळवून नेला होता. सुमारे 17 लाख 13 हजार पाचशे रुपये किमतीचा हा ऐवज होता. याबाबतची तक्रार या बंगल्याचे केअर टेकर संतोष कासार यांनी मुरूड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. आरोपीला पकडून त्याच्यावर भा. दं. वि. कलम 379 अनव्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply