Breaking News

कार्यकर्त्यांनी झटून काम करावे -श्रीरंग बारणे

कर्जतमध्ये महायुतीची विराट रॅली

कर्जत : बातमीदार

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केल्याने लोकसभा निवडणुकीत आपला मोठा विजय झाला, तसेच काम शिवसैनिकांनी कर्जत विधानसभा मतदारसंघात करावे, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तालुक्यातील प्रचार फेरीत बोलताना केले. कर्जत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमरोली प्रभागात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेला खासदार श्रीरंग बारणे संबोधित करीत होते. सहा महिन्यांपूर्वी आपण लोकसभेवर भगव्याचा शिलेदार पाठवलात, तशीच साथ देऊन मतदारांनी या वेळी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी या वेळी केले. संपूर्ण राज्याचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. तसाच कौल कर्जत विधानसभा मतदारसंघातदेखील आहे. देशात व राज्यातील सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे आणि या वेळी कर्जतचा आमदार हा महायुतीचाच होणार असल्याचा विश्वास खासदार बारणे यांनी या वेळी बोलून दाखवला. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी, रायगड जिल्हा सल्लागार आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख बबन पाटील, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, युवा सेना तालुका अधिकारी अमर मिसाळ, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी उपतालुकाप्रमुख शशिकांत मोहिते, माजी सभापती प्रदीप ठाकरे, युवा सेना मतदारसंघ संघटक संदीप बडेकर, शिवसेना विभागप्रमुख ठोंबरे, संघटक महेश विरले, नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे, भाजप विभाग अध्यक्ष केशव तरे आदींसह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply