Breaking News

कार्यक्रम, उपक्रमांतून बोलीभाषांचागौरव व्हावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्ररह वृत्त
मराठी भाषेमध्ये अनकेबोली भाषा आहेत. प्रत्येकाला बोली भाषेचा गर्व वाटला पाहिजे, अशा बोलीभाषांचा वेगवगेळ्या कार्यक्रम व उपक्रमांतून गौरव व्हावा, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात आगरी भाषेतील प्रतिज्ञा फलकाचे अनावरण सोहळ्यावेळी केले.
या कार्यक्रमासकोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील, लेखक काशिनाथ मढवी, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचात सरपंच आनंद ढवळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, आपण ज्या ठिकाणी काम करतो, राहतो अशा ठिकाणांची बोली भाषा ही आपल्याला माहिती असलीच पाहिजे. देशाची प्रतिज्ञा पनवेलच्या मूळ भाषेत फलकाद्वारे कार्यालयाच्या आवारात लावल्याने पनवेलकरांसाठी हा एक गौरवपूर्ण सोहळा आहे. ग्रामीण भागाचे व्यवस्थापन करणारी पनवेल पंच्यात समितीने हा अभिनव उपक्रम राबविल्याने गट विकास अधिकारी समीर वाठारकर यांचे कौतुक करून आगरी भाषेतील साहित्य हे पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजे. लोकांपर्यंत आगरी भाषा बोलली गेली पाहिजे. आगरी भाषा सर्वांच्या माध्यमातून समृद्ध व्हावी, असे शेवटी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुखप्रा. एल.बी.पाटील, यांनी आपल्या भाषणात, आगरी भाषेतील प्रतिज्ञा फलकाच्या उपक्रमाचे कौतुक केले. पनवेल पंचायत समितीने राबवलेला या उपक्रमाचा या भागातील आगरी बोली भाषा बोलणार्‍यांना अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे.
पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी, बोली भाषा या शुद्धच असतात व्यवहार भाषा ही प्रमाण भाषा असते इतर भाषांप्रमाणे या भागातील आगरी बोली भाषा ही तितकीच तोलामोलाची आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचासंदेश विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,लेखक काशिनाथ मढवी यांची भाषणे झाली. यावेळी कृषी विभागाचे विस्तार अधिकारी मुकेश कांबळे यांनी आगरी भाषेतील कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेरे केंद्र प्रमुख रंजना केणी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पांढरे यांनी मानले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply