खासदार छत्रपती संभाजीराजेंची माहिती
महाड, प्रतिनिधी
किल्ले रायगड संवर्धनासाठी पुढील सहा महिन्यांचा प्लॅन ऑफ अॅक्शन तयार असून, रायगड प्रकल्प हा युनिक आयडल ठरणार असल्याचा विश्वास रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने 600 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधीकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे.
संवर्धनासंदर्भात माहिती देताना छत्रपती संभाजीराजेंनी सांगितले की, किल्ले रायगडवर प्राधीकरणच्या माध्यमातून झालेल्या कामांबाबत आपण समाधानी असून, कोणतेही कामे एक टक्काही खराब झालेले नाही. लवकरच गडावरील उर्वरित कामांना सुरुवात होईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper