Breaking News

कुलदीप यादवचे धमाकेदार कमबॅक

द्रविडला दिले श्रेय

कोलंबो ः वृत्तसंस्था
कुलदीप यादव जेव्हा भारतीय संघात आला होता तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली होती. चायनामॅन गोलंदाज आणि युजवेंद्र चहल ही जोडी कुलचा या नावाने प्रसिद्ध होती, पण नंतर अशी वेळ आली की सर्व जण या गोलंदाजाला विसरले. भारतीय संघ व्यवस्थापनाने या गोलंदाजाला बाजूला केले. इतक नव्हे तर आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सनेदेखील त्याला संधी देण्याचे बंद केले. अखेर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत कुलदीपने सर्वांचे तोंड बंद केले.
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर जेव्हा पहिल्याच चेंडूवर चहलने विकेट घेतली तेव्हा कुलदीपने तिसर्‍या षटकात लंकेला दोन झटके दिले. या दोन विकेटमुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि केकेआर यांना चोख उत्तर मिळाले. धोनी कर्णधारपदावरून बाजूला झाल्यानंतर कुलदीपला संधी कमी मिळत गेली. धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याला विकेटच्या मागून हवी असणारी मदतदेखील बंद झाली होती. यामुळे कुलदीपची कामगिरी घसरली होती.
पहिल्या वन डेत कुलदीपने 9 षटकात 48 धावा देत दोन विकेट घेतल्या. सामन्यानंतर कुलदीप म्हणाला, कठीण काळात प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी साथ दिली. माझ्या यशाचे श्रेय त्यांचे आहे. त्यांनी मला खेळाचा आनंद घेण्यास सांगितले. तुम्ही जेव्हा खेळत असता तेव्हा दबाव व भीती नेहमी असते. मी खूप दिवसांनी खेळत होतो, परंतु राहुल सरांनी मला पाठिंबा दिला. चांगल्या कामगिरीमुळे मी खुश आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply