Breaking News

कृष्णा पाटील सामाजिक मंडळाच्या वतीने गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

कळंबोली ः प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीत जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले कामगार व निराधार महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा 52 गरीब, गरजू कोकणवासीय कुटुंबांना मदतीचा हात देत कृष्णा पाटील सामाजिक मंडळाच्या माध्यमातून भाजपचे नेते कृष्णा पाटील यांच्या हस्ते अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुग

येथील कुटुंबांचा समावेश आहे.

कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात भाजप नेते कृष्णा पाटील यांनी गरीब, गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी गोरगरीब व निराधारांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. 12) कृष्णा पाटील सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पडघे गावात राहणार्‍या 52 रत्नागिरी, सिंधुदुर्गवासीय कुटुंबीयांना भाजप नेेते कृष्णा पाटील यांच्या हस्ते अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तळोजा औद्योगिक वसाहतीला लागूनच पडघे गाव असल्याने येथे सर्व प्रांतांतील लोक राहतात. लॉकडाऊन काळात या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कृष्णा पाटील सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply