Breaking News

केंद्रीय रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांची आरसीएफ थळ प्रकल्पाला भेट

अलिबाग :  प्रतिनिधी
केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी (दि. 8) राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)च्या थळ प्रकल्पाला भेट दिली.
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आरसीएफच्या उच्च व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत थळ कारखान्यातील ऊर्जा कार्यक्षमता वाढीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि ऊर्जा व पर्यावरण संवर्धनासंबंधीच्या प्रस्तावांवर चर्चा केली. त्यानंतर विविध संयंत्रांना भेट देऊन संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.
तत्पूर्वी आरसीएफ थळच्या प्रशासकीय इमारतीसमोर वृक्षारोपण तसेच कार्यकारी संचालक यांच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मंत्री महोदयांच्या हस्ते झाले तसेच भेटीदरम्यान सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन आरसीएफने 2021-2022मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मंत्री महोदयांनी कौतुक केले. कोरोना महामारीच्या कठीण काळात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल कर्मचार्‍यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत संकल्पना सुनिश्चित करण्यासाठी आरसीएफच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply