पनवेल ः वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने कै. सौ. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताहाचे आयोजन पनवेलमधील श्री विरूपाक्ष महादेव मंदिरात करण्यात आले आहे.
कीर्तन सप्ताह 3 ते 9 मार्चपर्यंत विरूपाक्ष मंदिरात रोज रात्री 9.30 वाजता होणार असून यामध्ये विविध शहरातील नामांकित कीर्तनकार हे कीर्तन सादर करणार आहेत. त्यांना नंदकुमार कर्वे, गणेश घाणेकर (तबला) साथ संगत
करणार आहेत.
क्रांतीचा जयजयकार कीर्तन सप्ताहास सर्व राष्ट्रप्रेमी भाविक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने व श्रद्धेने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संदीप लोंढे आणि त्यांच्या परिवारातर्फे करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper