उरण ः रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सक्रिय कार्यकारणी सदस्य मेघनाथ अमृत म्हात्रे (जासई, ता. उरण) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालयात येत्या रविवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समिती आणि जासई ग्रामस्थांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper