
मुरुड : मोटारसायकल आणि कॉलिस कारची भालगाव (ता. मुरुड) या गावाजवळ समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार आणि त्याचा सहप्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. भालगांव येथील सुरज घाडगे हे आपल्या मालकीच्या मोटारसायकल (एमएच-04, ईआर-9464)वरून कविता शेलार यांना घेऊन आगरदांडाकडे जात होते. त्याचवेळी नांदला गावाकडून कॉलिस (एमएच-04, सीएम 4455) गाडी लग्नाचा वर्हाड घेवून मंडणगड-दापोली येथे जात होती. भालगाव या गावापासून काही अंतरावर या दोन्ही गाड्यांत समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात मोटारसायकल चालक सूरज घाडगे (वय 30, रा. भालगाव) व त्यांच्या पाठीमागे बसलेली कविता किशोर शेलार (रा दांडगुरी, ता. मुरुड) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना मुुंबईतील केइएम हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहेे. या अपघाताची नोंद मुरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, कॉलीस कार चालक जयंत गणपत कलमकर (रा.साताक्रुज, मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper