उरण : कोप्रोली गावचे ग्रामदैवत श्री बापुजीदेव गावदेवी जोगेश्वरी माता आणि जरीमरी मातेचा यात्रोत्सव यंदा मंगळवारी (दि. 21) व बुधवारी (दि. 22) होता, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या करिता यंदा पारंपारिक यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. देशामध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे, त्यामुळे देशात तसेच राज्यात 3 मेपर्यंत संचारबंदी व लॉकडाऊन असल्याने या कालावधीत असलेली यात्रोत्सव रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत कोप्रोली व ग्रामस्थ मंडळ कोप्रोली यांनी दिली आहे. गावातील नागरिक दर्शनाला जाताना सोशल डिस्टन्सिंग ठेवतील. त्याचप्रमाणे शासनाचे नियमाचे उल्लंघन होणार नाही त्याबद्दल विशेष लक्ष दिले जाईल, असेही ग्रामस्थांनी सांगितले.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper