Breaking News

कोरळवाडी आदिवासी उपोषणावर ठाम

पनवेल : रामप्रहर वृत्त – आदिवासी विकास विभागाच्या बैठकीनंतरही राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने काही मागण्यांसाठी कोरळवाडी आदिवासी बांधव 9 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीमधील कोरळवाडी आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रस्ता नाही ह्या वाडीची लोकसंख्या सुमारे 145 एवढी असून कुटुंब संख्या 47 एवढी आहे. वाडीला तारा गावाजवळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ह्या मुख्य रस्त्यला जोडावे अशी मागणी आहे. मात्र राज्य सरकार याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे कोरळवाडीतील संतप्त आदिवासी बांधवांनीं ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून पनवेल प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसत आहेत.

या संदर्भातील बातम्यांचा आधार घेऊन गुरुवारी (दि. 6)एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग रायगड पेणच्या प्रकल्प अधिकार्‍यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पेण, वनपरिक्षेत्र अधिकारी पनवेल, गट विकास अधिकारी पंचायत समिती पनवेल, अभियंता रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि कोरलवाडी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली या बैठकीत सर्व मागण्यांवर चर्चा करून ग्रामस्थांनी आमरण उपोषण मागे घेण्याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केली परंतु राज्य सरकारच्या संबंधित खात्याकडून कोरलवाडी ग्रामस्थांना साधे पत्र देखील दिले नसल्याची खंत व्यक्त करीत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय कोरलवाडी ग्रामस्थांनी घेण्यात आला.

या वेळी समाजवसेवक संतोष ठाकूर, ग्राम संवर्धनचे कार्यकर्ते उदय गावंड, राजेश रसाळ, संतोष पवार, गुरुदास वाघे, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply