Breaking News

कोरोनाचे नियम मोडल्याने माणगावात चार दुकाने सील

माणगाव : प्रतिनिधी

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माणगाव नगरपंचायतीने शहरातील चार दुकानांना टाळे ठोकले असून काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. माणगाव शहर तसेच तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ती आटोक्यात आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अनेक नागरिक व व्यापारी कोरोनाविषयक नियमांचे राजरोस उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे तसेच मंगेश पाटील, रामदास पवार व इतर कर्मचारी माणगाव शहरात फिरत असताना जुन्या बसस्थानकाजवळील श्री जसोल किराणा दुकान, एक फळविक्रेता, महामार्गावरील सिगारेट, विडी, तंबाखू दुकान, नाकोडा स्टील यांच्यासह अन्य काही दुकाने नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळले. त्यापैकी चार दुकाने सील करण्यात आली असून, अन्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply