नवी दिल्ली ः देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, मात्र असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या दुसर्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात आला असून आतापर्यंत सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नीती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी काही सूचना दिल्या आहेत. त्यात 100 पैकी 23 रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था करण्यास त्यांनी सांगितले आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper