Breaking News

कोरोनाला रोखण्यासाठी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सज्ज

ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीवर भर

पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावताना दिसत आहे. येथील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका तसेच ग्रामपंचायात स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीतर्फे युद्धपातळीवर ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी, ह्रदयाचे ठोके व तापमानाचे मोजमाप तपासणी सुरू आहे.

सरपंच उमेश यादव, उपसरपंच योगेश सुरावकर, नथुराम चोरघे, सर्व सदस्य, आरोग्य व ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी, पोलीस पाटील आणि आशासेविकांमार्फत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. मागील पाच महिन्यांपासून सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांत जनजागृती, विलगीकरण, तपासणी व औषधोपचार देणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन मिळत आहे. आरोग्यसेवक तांबोळी याकामी मेहनत घेत आहेत. ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी व तापमान तपासणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. लक्षणे असल्यास जवळील आरोग्यसेवक, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य किंवा अंगणवाडी सेविकांना भेटून माहिती द्यावी, जेणेकरून पुढील तातडीचे उपचार करता येतील, असे आवाहन सरपंच उमेश यादव यांनी केले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply