नवी दिल्ली ः देशात कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली जात आहेत. देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले जात आहे. कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने टाकले आहे. भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) कोरोनाच्या उपचारात टोसिहिजुबॅम औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. याचा वापर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तींवर केला जाईल. औषध निर्मिती करणारी कंपनी हेटेरो ड्रग्जसने याबाबतची माहिती सोमवारी (दि. 6) दिली. हेटेरो ड्रग्जने म्हटले की, कोरोनाच्या उपचारात हे औषधे महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper