Breaking News

कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर रुग्णवाहिकेत बलात्कार; चालक अटकेत

तिरूअनंतपूरम : वृत्तसंस्था

देशात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांनी चिंता व्यक्त होत असताना माणुसकीला काळीमा फासणार्‍या काही घटना घडत आहेत. केरळमध्येही अशीच घटना घडली असून, कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना चालकाने रुग्णवाहिकेतच तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे संंताप व्यक्त होत आहे.केरळमधील पथाणमथिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली. एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी शनिवारी रात्री रुग्णवाहिका आली होती. या वेळी रुग्णवाहिकेत महिलेसोबत आणखी एक कोरोना संक्रमित रुग्ण होता. रुग्णवाहिकेचा चालक नोफालने आधी दुसर्‍या रुग्णाला कोविड सेंटरमध्ये सोडले. त्यानंतर महिलेला वेगळ्या रुग्णालयात घेऊन जात असताना चालकाने रुग्णवाहिका एका निर्जनस्थळी नेली. तिथे रुग्णवाहिका चालकाने महिलेवर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने पीडित महिलेला कोविड केअर सेंटरमध्ये सोडले. पीडितेने या घटनेची माहिती तेथील कर्मचार्‍यांना दिली. त्या कर्मचार्‍यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून रुग्णवाहिकेच्या चालकाला अटक केली, अशी माहिती पथाणमथिट्टाचे पोलीस अधीक्षक के. जी. सिमोन यांनी दिली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply