नवी दिल्ली : देशाची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य क्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 18) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड-19 योद्ध्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. केंद्र सरकारने सुरू केलेला हा क्रॅश कोर्स 26 राज्यांतील 111 केंद्रांच्या माध्यमातून अमलात आणण्यात येणार आहे. देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी या क्रॅश कोर्सची मागणी केली होती. त्यामुळे देशातील सर्वोत्तम तज्ज्ञांच्या साहाय्याने केंद्र सरकारने हा क्रॅश कोर्स तयार केला आहे. त्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यांत एक लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper