Breaking News

कोरोना व्हायरससंदर्भात नवी मुंबईत डॉक्टरांचे प्रशिक्षण

नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग व ‘इ’प्रभाग समिती सदस्य डॉ. प्रतीक प्रभाकर तांबे यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 14) हिम्पाम, नवी मुंबई व निमा, नवी मुंबई या वैद्यकीय संघटनेच्या सर्व डॉक्टरांचे प्रशिक्षण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाले. कोरोनासंदर्भात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील डॉक्टरांनी याबाबत स्वत: व नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी तसेच या अनुषंगाने प्रतिबंधात्मक व आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य विभागाच्या डॉ. उज्ज्वला ओतूरकर यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले व डॉक्टरांच्या शंकांचेही निरसन केले, जेणेकरून डॉक्टर आपल्या रुग्णांना कोरोनाबाबत योग्य ती माहिती देऊन जागरूक करतील.

या वेळी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, ‘इ’ प्रभाग समिती सदस्य व नवी मुंबई हिम्पामचे अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे, महाराष्ट्र हिम्पामचे अध्यक्ष डॉ. एस. टी. गोसावी, निमा नवी मुंबई अध्यक्ष डॉ. विनायक म्हात्रे तसेच संघटनेचे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply